शासकीय रूग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मास्क वापरणे बंधनकारक होणार

Beed

शासकीय रूग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मास्क वापरणे बंधनकारक होणार

बीड/प्रतिनिधी

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये सतर्क बाळगण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. उपाययोजनांवर भर देत असताना बीड जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मास्क वापरण्यास बंधनकारक केले जाणार आहे. हा निर्णय येणार्‍या एक, दोन दिवसात जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे हे घेवू शकतात.

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्यामुळे जगातील अनेक देशांनी सतर्कतेची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात देखील उपाययोजनांवर म्हणण्यापेक्षा काळजी घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा आरोग्य यंत्रणेतील शासकीय छोट्या आणि मोठ्या रूग्णालयात डॉक्टर आणि काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी मास्कचा वापर करावा जेणेकरून रूग्णालयात येणार्‍या रूग्णांसाठी आणि कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय येत्या एक ते दोन दिवसामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडून घेतला जावू शकतो.

 

धुळीसाठीही मास्क गरजेचाच

कोरोनातल्या दोन वर्षाच्या कालावधीत जेव्हा जेव्हा मास्क वापरण्याचे बंधन घातले गेले तेव्हा तेव्हा कोरोनाबरोबरच धुळीपासून सुद्धा संरक्षण मास्कमुळे मिळाले. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे हे घेत असलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

 

Sharing

Visitor Counter