सरपंचपदाच्या उमेदवार शितल साखरे यांनी १६४६ मतांची लिड घेऊन इतिहास घडविला

सरपंचपदाच्या उमेदवार शितल साखरे यांनी १६४६ मतांची लिड घेऊन इतिहास घडविला
बीड/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील धोंडराई ग्रामपंचायत निवडणूकीत चुरशीची लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार कु शितल अशोक साखरे यांनी भाजप शिवसेना पुरस्कृत ग्रामस्वराज्य जनसेवा विकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ सुवर्णा संतराम काळे यांचा १६४६ मतांनी दणदणीत पराभव करून भाकीत वर्तवल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने त्या परिवर्तनाच्या शिलेदार ठरल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरपंचपदाच्या उमेदवार कु शितल साखरे यांना ३११० मतं तर भाजप शिवसेना पुरस्कृत गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ सुवर्णा संतराम काळे यांना १४६४ मतं मिळाली या निवडणूक निकालात कु शितल अशोक साखरे यांना प्रतिस्पर्धीय उमेदवारापेक्षा न भूतो न भविष्यती अशी चक्क १६४६ मतांची लिड घेऊन अक्षरश इतिहास घडविला आहे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मंगळवारी रात्री गावातून भव्यदिव्य मिरवणूक काढून कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठा गाजावाजा करत जल्लोष साजरा केला धोंडराई ग्रामपंचायतच्या अटीतटीच्या झालेल्या दुरंगी लढतीत उच्च शिक्षीत असलेल्या सरपंचपदाच्या उमेदवार कु शितल अशोक साखरे यांना धोंडराई ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व स्तरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता खऱ्या अर्थाने त्या या गावासाठी परिवर्तनाच्या शिलेदार ठरणार असल्याचे भाकीत मतदानाच्या आदल्या दिवशीच वर्तविले होते मंगळवार दिनांक २० डिसेंबर रोजी गेवराई पंचायत समितीमध्ये पार पडलेल्या मतमोजणीत कु शितल साखरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले या निवडणूक निकालाकडे गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते धोंडराई ग्रामपंचायत निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी बीड जि. प . चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित तसेच सैराट चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका बजावणारे तानाजी गालगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली त्याचवेळी मतदारांनी त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते त्या सभेला महिला तरुण वर्ग पुरूष मंडळी यांची न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती या गर्दीचा उच्चांक पाहून सरपंचपदाच्या उमेदवार कु शितल अशोक साखरे आणि त्याच्या पॅनलचे सदस्यपदासाठी उभे असलेले १७ उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणार असा अंदाज बहुतांश मतदारांनी व्यक्त केला होता दुसरीकडे भाजप शिवसेना प्रणित ग्रास्वराज्य जनसेवा विकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ सुवर्णा संतराम काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील आपली ताकद पणाला लावून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते तसेच या निवडणूकीत सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून मनिषा बाळासाहेब कुटे या देखील निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या परंतु राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार कु शितल अशोक साखरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निकालात चांगलीच मुसंडी मारली असून सरपंचपदाच्या उमेदवार कु शितल अशोक साखरे यांच्यासह सदस्य पदासाठीच्या १७ पैकी १७ उमेदवारांनी दणदणीतपणे विजय संपादन करुन विरोधकांना अक्षरश चारीमुंड्या चित केले सरपंच कु शितल अशोक साखरे यांनी मतदारांच्या आशिर्वादाने अख्खं पॅनल निवडणून आणून परिवर्तन तर केलेच परंतु खऱ्या अर्थाने इतिहास देखील घडविला आहे या निवडणूक निकालानंतर माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आ अमरसिंह पंडित बीड जि प चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित त्यांनी शितल साखरे हिचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
