जिल्हा जात पडताळणी समिती बीड तर्फे उर्दू शिक्षण परिषद गेवराई मध्ये मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Beed

जिल्हा जात पडताळणी समिती बीड तर्फे उर्दू शिक्षण परिषद गेवराई मध्ये मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

बीड/वार्ताहर

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,बीड तर्फे अख्तर सज्जाद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मादळमोही ता.गेवराई जिल्हा बीड येथे आयोजित गेवराई तालुका उर्दू शिक्षण परिषदेमध्ये मंडणगड पॅटर्न राबविण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य,लिपिक,समानसंधी केंद्राचे प्रमुख यांना मार्गदर्शन करण्यात आले.सदरील कार्यक्रमास जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त श्रीमती.मकरंद मॅडम यांनी जात पडताळणी बद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.बेग सर होते. प्रमुख उपस्थिती श्री.गोपाळ गरेकर(गटशिक्षणाधिकारी गेवराई) यांची होती.आजच्या मार्गदर्शन कार्यक्रमास गेवराई तालुक्यातील 20 शाळा,हायस्कूलचे,महाविद्यालय यांचे प्राचार्य ,कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.श्रीमती.मकरंद मॅडम यांनी अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11 वी 12 वी मध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणी येऊ नये यासाठी समितीकडे विहित कालमर्यादेत अर्ज करण्याचे आवाहन केले.उपायुक्त श्रीमती मकरंद मॅडम यांनी पुढे बोलताना माहिती दिली की विद्यार्थी /पालक विहित कालमर्यादेत समितीकडे अर्ज सादर न केल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासुन वंचित लागु नये म्हणून बीड जिल्हातील सर्व महाविद्यालयांनी जास्तीत जास्त इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी / सीईटी देणारे / डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे व महाविद्यालयालय प्राचार्य, लिपिक,समान संधी केंद्राचे प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना मदत,मार्गदर्शन करून महाविद्यालयात अर्ज जमा करावीत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड उपायुक्त मकरंद मॅडम केले आहे.

 

Sharing

Visitor Counter