आ.संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात मांडले आदर्श,नवगण,विनायक संस्था व आनंद कृषी प्रतिष्ठान यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्षवेधी!

Beed

आ.संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात मांडले आदर्श,नवगण,विनायक संस्था व आनंद कृषी प्रतिष्ठान यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्षवेधी!

उत्तर देतांना शालेय शिक्षण मंत्री गेले गोंधळुन

लेखा परीक्षणाची अधिकार्‍यांमार्फत विशेष चौकशी व्हावी; माजी मंत्री आ.प्रकाशदादा सोळंके, आ.संदीप क्षीरसागरांची मागणी

नागपुर/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात भ्रष्ट काराभाराचे जाळे पसरलेले प्रस्थापितांच्या आदर्श शिक्षण संस्था,नवगण शिक्षण संस्था,विनायक युवक कल्याण व आनंद कृषी प्रतिष्ठाण बीड या संस्थे अंतर्गत झालेल्या विविध भ्रष्टाचार प्रकरणी सभागृहात लक्षवेधी क्र.401 मांडून आ.संदीप क्षीरसागरांनी भ्रष्ट कारभार प्रकरणी पुरावे सादर केले असता त्यास उत्तर देतांना शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर गोंधळुन गेले. भ्रष्ट काराभाराप्रकरणी लेखा परिक्षणाची अधिकार्‍यांमार्फत विशेष चौकशी व्हावी यावर आ.प्रकाशदादा सोळंके व आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी मागणी केली. 

बीड जिल्ह्यात मागील सहा ते सात दशकापासून आदर्श शिक्षण संस्था,नवगण शिक्षण संस्था,विनायक युवक कल्याण व आनंद कृषी प्रतिष्ठाण बीड या प्रस्थापितांच्या संस्थेने शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून या प्रकरणी बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी नागपुर अधिवेशनचे औचित्य साधून लक्षवेधी मांडली. सुमारे दहा मिनिट चर्चा झालेल्या या लक्षवेधीत मुद्देसुद माहिती सांगतांना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, विद्यार्थी नावासाहित आधार कार्ड लिंक असलेले,नसलेले व दुबार असले बाबत विभागाला दि.06.09.2022 ते 31.10.2022 पर्यंत एकुण 8 पत्रे दिलेली आहेत, माहिती पुर्ण भेटू शकली नाही, विद्यार्थी नावासाहित आधार कार्ड लिंक असलेले,नसलेले व दुबार असले बाबत विभागाला दि.06.09.2022 ते 31.10.2022 पर्यंत एकुण 8 पत्रे दिलेली आहेत, माहिती पुर्ण भेटू शकली नाही, शालेय पोषण आहारच्या माहिती विषयी दि.29.08.2022 ते 06.12.2022 पर्यंत एकूण 9 पत्रे दिलेली आहेत,लेखाधिकारी मार्फत माहिती अल्प मिळाली आहे, संच मान्यता व बिंदुनामावली बाबत दि.29.08.2022 व 06.09.2022 पर्यंत पत्राने माहिती मागवली असता सन 2020-21 ची संच मान्यता झालेली नाही. तरी देखिल शाळेवरील शिक्षकांचे वेतन वितरित झालेले आहे. तसेच गावाच्या लोकसंख्येपेक्षा काही शाळेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे, लेखा परीक्षण अहवाला संदर्भात एकुण दि.06.08.2022 ते 02.09.2022 पर्यंत एकुण 6 पत्रे दिलेली आहेत,विभागाने दिलेल्या लेखा परीक्षण दि.30.08.2022 अहवालाच्या अनुपालनामध्ये त्रुटी आहेत, आश्रम शाळामधील सर्व प्रकारची माहितीसाठी दि.20.09.2022 ते 06.12.2022 पर्यंत एकूण 7 पत्रे दिलेली आहे, त्यामध्ये मुख्याध्यापकाने सहाय्यक आयुक्तांना कळवले आहे सदरील माहिती व्यापक जनहित साध्य न करणारी असल्याने देता येणार नाही. सामाजिक न्यास/धर्मादाय यांनी तीनही संस्थेची जंगम मालमत्ता,उत्पन्नाचे मार्ग,वार्षिक अहवाल, घटनेनुसार घेतलेल्या निवडणुका,घेतलेले कर्ज,वार्षिक नफा-तोटा याविषयी माहिती दिलेली नाही. त्यांना दि.31.08.2022 च्या तीन पत्राद्वारे तीनही संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणे बाबत पत्र व्यवहार केलेला आहे. कार्यालयाकडून दि.19.12.2022 रोजी अनुपालन आले असता वरील विषयी लक्ष न देता येथून पुढे चुका न होणे बाबत निर्देशीत केलेले आहे, सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांना पत्राद्वारे माहिती मागवली असता मा.आमदार हे आमच्या संस्था प्रमुखाचे राजकीय विरोधक असल्याने सदरील माहिती राजकीयद्वेषापोटी मागवली आहे असे दि.28 व 30.09.2022 रोजी पत्रान्वये आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी कळविली आहे, तसेच दि.20 ऑक्टोबर 2022 च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रात देखिल मुख्याध्यापकांनी संस्थेच्या वतीने निवेदनामध्ये केवळ राजकीय व वैयक्तिक आकसापोटी माहिती मागविलेली आहे असे नमुद केले आहे, ग्रामपंचायत निवडणुक 2022 या प्रक्रियेमध्ये वरील संस्थेचे कर्मचारी यांनी राजकीय कार्यकर्ते म्हणुन प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेला आहे. दि.07.12.2022 ते 17.12.2022 या कालावधीमध्ये राज्य निवडणुक आयोग व जिल्हा पातळीवर पत्र व्यवहार केलेला आहे. चौकशी व कार्यवाही झालेली नाही या प्रमाणे सभागृहात आ.संदीप क्षीरसागरांनी प्रस्थापितांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला आणि संबंधित विभागात शंभरावर पत्र व्यवहार करून सुद्धा अधिकार्‍यांनी समाधानकारक उत्तर न देता लोकप्रतिनिधीवर ठपका ठेवत तुम्ही राजकीय आकसापोटी खोट्या तक्रारी दाखल करून माहिती मागवत आहेत असे संबंधित विभागाने आरोप एका लोकप्रतिनिधीवर केले ही लाजीरवाणी बाब आहे. या भ्रष्टाचारा संदर्भात माजी मंत्री आ.प्रकाशदादा सोळंके यांनी लेखा परीक्षणाची अधिकार्‍यांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली. या वर उत्तर देतांना शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर म्हणाले की, सदरील भ्रष्टाचार प्रकरणी आ.संदीप क्षीरसागर यांनी मुद्देसुद माहिती साभगृहासमोर मांडली असून या प्रकरणी मी सभागृहात लगेच उत्तर देवू शकत नसून हे प्रकरण ऐकून मी निरूत्तर होवून गोंधळुन गेलो असून या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांना, संस्था चालकांशी मुंबईत माझ्या दालनात लवकरच बैठक घेवून कारवाई केली जाईल असे आश्वासनही शालेय शिक्षण मंत्री यांनी यावेळी दिले. 

Sharing

Visitor Counter