सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी चिंचगव्हाण ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी चिंचगव्हाण ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
3 जानेवारी रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार -- ऍड.अमोल डोंगरे
माजलगाव/प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यापासून चिंचगव्हाण येथील सार्वजनिक पाणीपुरवठा बंद असल्यामुळे अबाल,वयोवृद्ध महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक लेखी वा तोंडी तक्रार करुन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने चिंचगव्हाण येथील ग्रामस्थ बहुजन समाज पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड.अमोल डोंगरे यांच्या नेतृत्वा -खाली दि.3 जानेवारी रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मागील चार वर्षापासून ग्रामपंचायत चिंचगव्हाण अंतर्गत होत असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील पाणी नमुने तपासणी करुन पिण्यास योग्य पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे.व चिंचगव्हाण येथील ग्रामस्थांची फरफट थांबवावी अन्यथा दि.3 जानेवारी रोजी पाण्याच्या टाकीवर चढून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
