बीड जिल्हा व्यापारी संघ अध्यक्षपदी भास्करराव जाधव

Beed

बीड जिल्हा व्यापारी संघ अध्यक्षपदी भास्करराव जाधव

कार्याध्यक्षपदी अशोकअप्पा शेटे, संतोष अब्बड यांची निवड

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्हा व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची तर कार्याध्यक्षपदी अशोक शेटे, संतोष अब्बड यांची निवड करण्यात आली. येथील हॉटेल अन्विता येथे मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री.आदेशपाल छाबडा व माजी अध्यक्ष श्री.मानसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

हॉटेल अन्विता येथे झालेल्या बैठकीस महाराष्ट्र चेंबर्सचे माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, विद्यमान सचिव वाय. जनार्दनराव यांची प्रमुख उपस्थिती होती. उर्वरित कार्यकारिणीत वरीष्ठ उपाध्यक्ष ज्ञानोबा फड (परळी), सुरेश बरगे (गेवराई), महासचिव तुकाराम साळुंके व सचिव गंगाभिषण करवा, सहसचिव टिळक रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जोशी, मनोहर घुले, कोषाध्यक्ष बालाप्रसाद जाजू, प्रसिध्दी प्रमुख रवि उबाळे, अनिल भंडारी, विकास उमापूरकर, गणेश लोहिया, प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर आदी, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अजय जाहीर पाटील, राम मोटवानी, नागेश मिटकरी, जवाहरलाल कांकरिया, भारत झांबरे, लईक अहमद, नारायण सातपुते, विश्वंभर थिगळे, सुरज लाहोटी, बबनराव गोरे, दिनेश मुंदडा, प्रकाश कोटेचा, महेश शेटे, सुनिल माने, राजु संचेती, सुशिल खटोड, राणा चव्हाण, विलास मिरगणे (केज), मनसुखलाल देसरडा (शिरूर का.), पांडूरंग मिटकरी (केज), नंदकिशोर बियाणी (परळी), उध्दव रामभाऊ फड (परळी).

कार्यकारीणी सदस्यः श्री गणेश जाधव (माजलगांव), बद्रीशेठ मानधने, शेख सललाउद्दीनभाई (माजलगांव), प्रमोद लुनावत (शिरूर), नितीन काळे (केज), गोविंद जाजु (केज), गोपाळ वैजीनाथराव कंकाळ (परळी), अतुल मौजकर, प्रमोद सारडा, अमोल शेटे.

तर मार्गदर्शक म्हणून सत्यनारायण लाहोटी, अनंतराव रूद्रवार (माजलगांव), एस.पी. लड्डा (सीए), वाय.जनार्धनराव, भानुदास जाधव (सीए), शांतीलाल पटेल, मनमोहन कलंत्री, अरूणराव बरकसे, अमृतलाल सारडा, सत्यनारायण कासट, गोपाल कासट (सीए), मनोज दुग्गड (सीए), राजेंद्र मुनोत, राजेंद्र बनसोडे याप्रमाणे नुतन कार्यकारीणी सर्वानुमते नियुक्त करण्यात आली. या प्रसंगी आदेशपाल छाबडा, मानसिंगजी पवार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजेंद्र मुनोत यांनी केले तर आभार तुकाराम साळुंके यांनी मानले.

 

Sharing

Visitor Counter