करोडो रूपयाचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्यावर कारवाई कोण करणार?

करोडो रूपयाचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्यावर कारवाई कोण करणार?
बीड/वार्ताहर
बीडची नगरपालिका ये ना त्या कारनाने नेहमीच चर्चेत असते पण ही चर्चा चर्चाच नसते त्यामध्ये मोठया प्रमाणात खर्च झालेले असते बीड नगरपालिकेत कंत्राटी बेसवर म्हणजे 11 महिनेच्या करारावर नगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची देखरेख करण्यासाठी पालिकाने घेतलेले अभियंताने भलताच कारनामा अंजाम दिला आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.उत्कृष गुट्टे यांच्या आर्शीवादाने पालिकेच्या बांधकाम विभागात हजारो नव्हे लाखे नव्हे तर करोडोच्या आसपास सिमेंट रस्ते, सिमेंट नाले सह इतर विविध कामाचे अंदाजपत्रक तयार केले त्याच्यावर ज्युनिअर इंजिनिअर नगरपरिषद बीड म्हणून स्वाक्षर्या ही केले त्या सर्व अंदाजपत्रकाची तांत्रीक मान्यता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाकडून करून घेण्यात आले परंतु या कंत्राटी बेस वरच्या अभियंताला हे अधिकार आहे का? शासनाच्या कोणत्या नियमा आधारे त्यांनी हे कामे केले? याची सखोल चौकशी करण्याची गरज दिसत आहे.या अभियंताला निलंबित केल्यानंतर ही त्यांना कोणत्या नियमाप्रमाणे पुन्हा कंत्राटी बेसवर घेतले आहे याची ही सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या अभियंताकडून शहरातील राजु नगर, दिलावर नगर, नाळवंडी रोडसह इतर भागातील विविध कामाचे अंदाजपत्रके तयार केले आहे तरी या सर्व कामाचे सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.