आगामी निवडणुका लढविण्यासाठी वंचित च्या कार्यकर्त्यांनी तयारी करावी - अशोक हिंगे 

Beed

आगामी निवडणुका लढविण्यासाठी वंचित च्या कार्यकर्त्यांनी तयारी करावी - अशोक हिंगे 

बीड/प्रतिनिधी 

आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी,पाटोदा,शिरुर या तिन्ही तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक धनगर जवळका या ठिकाणी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की जो पर्यंत आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ते मधे जात नाहीत तो पर्यंत वंचित समाजाचे दैनंदिन प्रश्न आपण सोडुन शकत नाहीत.बाळासाहेबांच्या विचाराला माननारा मतदार वर्ग मोठा आहे. परंतु आपण त्यांच्या पर्यंत पोहचतच नाहीत.निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आपण बांधनी करून तयारी केली पाहिजे. 

 यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या वंचित च्या कार्यकर्त्यांचा सत्कार मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसगी जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर जिल्हा उपाध्यक्ष गोरख झेंड , पुष्पाताई तुरुकमाने यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना बांधनी बाबत सवीस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या नंदा भंडारे, माजी जिल्हा महासचिव सचिन मेघंडबर, पाटोदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आष्टी तालुकाध्यक्ष किरण आखाडे शिरूर तालुकाध्यक्ष दिलीप माने तसेच तालुका पदाधिकारी युवक आघाडीचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter