शहर काँग्रेसच्या वतीने खासदार संतोष सिंग चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Beed

शहर काँग्रेसच्या वतीने खासदार संतोष सिंग चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

बीड/प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत पंजाबचे खासदार संतोष सिंह चौधरी सहभागी झाले होते, त्यादरम्यान त्यांचा चालताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाब राज्यात जालिंदर मतदारसंघाचे खासदार संतोषसिंह चौधरी यांचे , भारत जोडो यात्रा ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर सुरू असताना पंजाब राज्यात जालिंदर मतदार संघात गेल्यानंतर हा प्रकार सकाळी पाईचालताना हा प्रकार घडला.

बीड शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष परवेज कुरेशी यांच्या कार्यालयात खासदार संतोष सिंग चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालू श्रद्धांजली व अभिवादन करण्यात आले, यावेळी काँग्रेस चे शहराध्यक्ष परवेज कुरेशी, उपाध्यक्ष मिलिंद मस्के, देविदास जंगले,अमजद कुरेशी, जावेद कुरेशी सह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter