MPDA कायद्याअंतर्गत हातभट्टीची दारु तयार करणार्या इसमाची हर्सुल कारागृहात रवानगी

MPDA कायद्याअंतर्गत हातभट्टीची दारु तयार करणार्य इसमाची हर्सुल कारागृहात रवानगी
बीड/वार्ताहर
बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे व वाळु माफीयाचे तसेच हातभट्टीची दारू तयार करुण विक्री करणाऱ्याचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरुन पोलीस निरीक्षक श्री. संतोष साबळे पोलीस ठाणे बीड ग्रामीण यांनी दिनांक 22/10/2022 रोजी इसम नामे बंडु कठाळु गायकवाड वय 45 वर्षे रा. सौदाणा ता. जि. बीड याचे विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.सदर स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे हातभट्टीची दारु तयार करणे, जवळ बाळगणे, चोरटी विक्री करणे वगैरे स्वरुपाचे 06 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 05 गुन्हे मा. न्यायालयात न्यायप्रविष्ट असुन 01 गुन्हा पोलीस तपासावर आहे. सदरील इसम हा हातभट्टीची गावठी दारू तयार करुन तिचा चोरटा व्यापार करीत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासुन करडी नजर होती. सदर इसम हा पोलीसांची नजर चुकवुन हातभट्टीच्या दारुचा चोरटा व्यावार करीत होता. सदर इसमावर यापुर्वी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 93 प्रमाणे दिनांक 26/08/2022 रोजी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा जोमाने हातभट्टीची दारु तयार करुन, ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करण्याचे गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होता.
सदर प्रकरणात श्री. राधाबिनोद अ. शर्मा, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 17.01.2023 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम. पी. डी. ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र. 2023 /आरबी डेस्क- 1/पोल-1/ एम.पी. डी.ए.- 02 दिनांक 17.01.2023 अन्वये आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो.नि. श्री. संतोष साबळे पो.स्टे. बीड ग्रामीण यांना दिल्या होत्या. त्यांनी पो.नि. श्री. सतीष वाघ, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली गोपनिय खबऱ्याचे आधारे ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने सदर इसमास दिनांक 17/01/2023 रोजी 21.17 वा. ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बीड ग्रा. येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सुल कारागृह, औरंगाबाद येथे दिनांक 18.01.2023 रोजी 02.30 वा. हजर करून स्थानबध्द केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री. सचिन पांडकर, उपविपोअ बीड श्री. संतोष वाळके पो.नि. श्री. सतीष वाघ, स्थागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि संतोष साबळे, सपोनि उबाळे, पोना / सुनिल अलगट, अंकुश वरपे, जायभाये व बीड स्थागुशा चे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे यांनी केलेली आहे. भविष्यातही हातभट्टीची दारू तयार करणारे, विक्री करणारे व वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर गुंडावर जास्तीत जास्त एम.पी. डी. ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.
