नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची शैक्षणिक सहल संपन्न
ख़ुलदाबाद, दौलताबाद आणि सिद्धार्थ गार्डन येथे लुटला मनसोक्त आनंद
बीड/प्रतिनिधी
शहरातील जुना बाजार येथील नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची सहल नुकतीच औरंगाबाद दौलताबाद आणि खुलदाबाद जाऊन आली या सहलीचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची शैक्षणिक सहलीत मराठवाड्याची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील खुलदाबाद मधील सर्व सूफ़ी संतांच्या दर्गाहसह हज़रत औरंगजेब आलमगीर रहमतुल्ला अलैह यांचा ऐतिहासिक मकबरा दाखविण्यात आला. यानंतर ऐतिहासिक दौलताबादचा किल्ला दाखवून शेवटी औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ गार्डन दाखविण्यात आले. ज्यातील प्राणिसंग्रहालय, सर्पोद्यान, क्रीडा विभाग दाखविण्यात आले. येथे विद्यार्थ्यांनी झोके, घसरगुंडी आणि इतर खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. या शैक्षणिक सहलीमध्ये एकूण ७५ विद्यार्थी व विद्यार्थीनीने सहभाग घेतला. ही शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी (प्राचार्य) सिद्दीकी नवीद व स्टाफ सिद्दीकी नदीम, शेख अखील, शेख जमीर, शेख रहिम, शेख नुसरत, रेशमा हुसैनी, हाजेरा बाजी, रेशमा खान, सय्यद सरफराज आणि शेख मोहम्मद आरेफ यांनी परिश्रम घेतले.
