ग्रामीण हद्यीतील १४ वर्षाचे अल्पवयीन मुलींचे लैंगीक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक
ग्रामीण हद्यीतील १४ वर्षाचे अल्पवयीन मुलींचे लैंगीक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक
बीड प्रतिनिधी
पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे दिनांक ०८/०७/२०२३ रोजी अल्पवयीन मुलगी XYZ हिने पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे हजर येऊन तक्रार दिली की, अल्पवीयन मुलीवर यातील आरोपी रणजीत शिवदास शेंडगे रा.खापरपांगरी ता. जि. बीड याने बळजबरीने जबरी संभोग केल्यामुळे ती सहा महीन्याची गर्वधर राहीली होती. तसेच तिचा गर्भपात इतर आरोपींचे मदतीने करण्यात आला आहे वगैरे तक्रारीवरुन पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुरनं १९५/२०२३ कलम ३७६, ३१३, ३१५, ३१६, ३१८ भादंवि सह कलम ४, ६, ८, १२ पोक्सो कायदया प्रमाणे दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास सपोनि घनशाम अंतरप पिंक पथक बीड हे करीत होते.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड, अपर पोलीस अधीक्षक साहेब, बीड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बीड यांनी सदर गुन्हा हा अल्पवयीन मुलींचे लैंगीक शोषणाबाबतचा गंभीर स्वरुपाचा असुन गुन्हयातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि पिंक पथकाचे सपोनि घनशाम अंतरप यांना योग्य त्या सुचना देण्यात आलेल्या होत्या.
आज दिनांक १४/०७/२०२३ रोजी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी रणजीत शिवदास शेंडगे रा. खापरपांगरी ता.जि.बीड हा खापरपांगरी शिवारात एका शेतामध्ये लपुन बसला असल्याची गुप्त बातमी मिळालेवरुन पोनि / विश्वास पाटील, सपोनि अंतरप, पोउपनि / राजाभाऊ गुळभीले, पोह / दत्ता दुधाळ, पोह / सुनिल आलगट, पोना / अंकुश वरपे या सर्वानी मिळुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने योग्य ती माहीती काढुन त्याठिकाणी जाऊन मुख्य आरोपी रणजीत शिवदास शेंडगे रा. खापरपांगरी ता.जि.बीड यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. नंदकुमार ठाकुर साहेब, पोलीस अधीक्षक बीड, मा. श्री. सचिन पांडकर साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब, बीड मा. श्री. संतोष वाळके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बीउ यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / विश्वास पाटील, सपोनि घनशाम अंतरप, पोउपनि / राजाभाऊ गुळभीले, पोह / दत्ता दुधाळ, पोह / सुनिल आलगट, पोना / अंकुश वरपे यांनी केली आहे.