शेख सोहेल याचा अपघाती निधन

Beed

शेख सोहेल याचा अपघाती निधन

बीड प्रतिनिधी

शहरातील खासबाग परिसरात राहणाऱ्या शेख जावेद यांचा मुलगा शेख सोहेल यांचा आज दुपारी जालना रोड बायपास येथे समोरा समोरील दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. शेख सोहेल हा शांत स्वभावाचा व सर्वांना मदत करणारा तरुण होता, त्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

शहरातील खासबाग परिसरात राहणारा शेख सोहेल हा युवक परिसरातील नागरिकांसोबत नेहमीच शांतपणे व संयमी वागत असल्याने तो सुपरिचित होता, शहरातील जालना रोडवर समोरून येणाऱ्या दुचाकीने शेख सोहेल यास जोराची समोरासमोर धडक दिल्याने यातच सोहेल याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शेख सोहेल यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली या घटनेने शेख कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला, आज रात्री दहा वाजता शेख सोहेल यांच्यावर अंत्यविधी (नमाज-ऐ-जनाजा) तकिया मस्जिद येथे अदा करण्यात येणार आहे. शेख सोहेल यांच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण व पत्नी असा परिवार आहे शेख परिवारच्या कुटुंबात दैं.बीड प्रसार सहभागी आहे.

Sharing