बीड लोकसभा ३९ सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केज शहरात मतदान जनजागृतीची रॅली संपन्न

बीड लोकसभा ३९ सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केज शहरात मतदान जनजागृतीची रॅली संपन्न

केज/प्रतिनिधी 

बीड लोकसभा ३९ सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्लीज शहरात मतदान जनजागृतीची रॅली संपन्न झाली या रॅलीचे आयोजन तहसील कार्यालय केज व गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या रॅलीमध्ये शहरातील शाळा व महाविद्यालयाने सहभाग नोंदविला होता.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की, बीड लोकसभा ३९ सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी८-३० वाजण्याच्या दरम्यान तहसील कार्यालय केज व गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने केज शहरात मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रामराव पाटील महाविद्यालय, सरस्वती कन्या प्रशाला, विश्वनाथ महाविद्यालय, वसंत महाविद्यालय, मुर्जा उर्दू हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय यांच्यासह शहरातील अनेक शाळा व महाविद्यालय यांनी सहभाग घेऊन शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

केज शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी सकाळी ८-१५ वाजता पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात एकत्र येऊन थांबले. त्यानंतर केज तहसीलचे तहसीलदार अभिजीत जगताप, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर यांनी मतदान जनजागृती अभियान रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात करण्यात आली असून सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जय भवानी चौक धारूर रोड मार्गे मंगळवार पेठ कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय केज असा या रॅलीचा मार्ग होता. डी आर एल मध्ये महत्त्वाचे आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात मतदान जागृतीचे फलक व बोर्ड आणि पथकाचे वादन याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते त्यामुळे या रॅलीचे आकर्षण दिसून आले.

तहसील कार्यालयाच्या प्राणांमध्ये रॅली आल्यानंतर उपविभागीय अधिकारी वजाळे, तहसीलदार अभिजीत जगताप, पोलीस निरीक्षक महाजन, काय गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना मतदान विषयी माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी वरील अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील व शेजारील नागरिकांना मतदानाच्या दिवशी बाहेरगावी जाऊ देऊ नये व मोठ्या संख्येने सर्वांना मतदान करण्यासंबंधी माहिती देण्यात यावी व आपण आपल्या पालकाच्या नावे मतदान करण्याचे पत्र लिहून आपल्या पालकांना देण्यात यावे तसेच आपण दिलेले पत्र हे आपल्या शाळेच्या ग्रुप वर पाठवावेत म्हणजेच मतदानाचा टक्का वाढेल व नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, पत्रकार बांधव आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing