वाहतूक नियम भंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा बडगा; 186 वाहनांवर दंडात्मक कारवाई

वाहतूक नियम भंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा बडगा; 186 वाहनांवर दंडात्मक कारवाई
बीड प्रतिनीधी
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 186 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ₹1,50,400 दंड वसूल करण्यात आला आहे.ही विशेष कारवाई सपोनि सुभाष सानप, पीएसआय कुटुंबरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार गरजे, पोलीस हवालदार कुडके, पोलीस हवालदार मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख, पोलीस हवालदार शाहरुख, पोलीस हवालदार पाखरे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाघमारे, तसेच पोलीस हवालदार पाखरे व हवालदार बांगर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
