कायाकल्प फाऊंडेशन च्या वतीने वैकुंठ भूमी येथे वृक्षारोपण दीड वर्ष पासून वृक्षाच्या संगोपणाचे सातत्य

Dharur

कायाकल्प फाऊंडेशन च्या वतीने वैकुंठ भूमी येथे वृक्षारोपण

दीड वर्ष पासून वृक्षाच्या संगोपणाचे सातत्य

किल्लेधारूर/प्रतिनिधी

किल्ले धारूर शहरातील सामाजिक कार्यात सातत्य ठेवणारी कायाकल्प फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून शहरातील पोलिस स्टेशनच्या पाठीमागे वैकुंठ भूमीत वृक्षारोपण व त्या वृक्षांचे संगोपनाचे कार्य चालू आहे. गेल्यावर्षी वैकुंठ भूमीमध्ये जवळपास ४० ते ५० रोपटे लावून त्याचे संगोपन केले आहे. वैकुंठ भुमीचा परिसर निसर्गरम्य करण्याचा संकल्प केला असल्याने या ही वर्षी वृक्षलागवड करण्यात येत आहे.
किल्ले धारूर शहरातील काही नागरिकांच्या घरावर वड पिंपळ हे रोपटे मोठे होते आहेत. हे रोपटे जवळपास पाच ते सात फूट उंचीचे झाले होते. ही रोपटे जमिनीवर नव्हती. ही रोपटे किल्ले धारूर शहरातील नागरिकांच्या घरावर भिंतीवर होती. भविष्यात या रोपट्यांनी मोठे रूप धारण केल्यावर भिंतीला तडे गेले असते व भिंत पडल्याने जिवितहानी झाली असती त्यामुळे कायाकल्प फाऊंडेशनच्या सदस्यांनी संबंधितांच्या परवानगीने भिंतीवरील रोपटे काढून किल्ले धारूर शहरातील पोलिस स्टेशनच्या पाठीमागील वैकुंठ भूमीत वृक्षारोपण केले.
यावेळी कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, कायाकल्प फाऊंडेशनचे सचिव विश्वानंद तोष्णिवाल, अलंकार कामाजी, बालाजी सातभाई, जलदुत विजय शिनगारे यांनी वैकुंठ भूमीमध्ये वृक्षारोपण केले.

Sharing

Visitor Counter