लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

Beed

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

अहमदनगर विशेष प्रतिनिधी* (प्रा.रावसाहेब राशिनकर)

२६ जून२०२० अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा,ता.नेवासा, जि. अहमदनगर येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त शासकीय नियम व सामाजिक अंतराचे पालन करत प्राचार्य किसन सुकटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थी ओमकार संजय जावळे याची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर साठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य रघुनाथ भोजने,पर्यवेक्षक हरिभाऊ जावळे,प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.रावसाहेब राशिनकर,ज्येष्ठ शिक्षक, जनार्धन पटारे,राजेश शेंडगे,लहानु ताठे, शिक्षकेतर कर्मचारी सुभाष थोरात, प्रणित कोडं,अशोक शेटे, बंडू कापसे,ज्ञानदीप क्लासेस चे संचालक संतोष जावळे, प्राथमिक शिक्षक संजय जावळे उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter