वंचित बहुजन कामगार आघाडीच्या वतीने राजश्री शाहु महाराज जयंती साजरी

Beed

वंचित बहुजन कामगार आघाडीच्या वतीने राजश्री शाहु महाराज जयंती साजरी

प्रतिनिधी/सी.एल.झोडपे

जोगेश्वरी एम.आय .डि.सी.परिसरात वंचित बहुजन कामगार आघाडी व भारतीय बौद्ध महासभा जोगेश्वरी शाखेच्या वतीने आरक्षणाचे जनक राजश्री शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
राजश्री शाहु महाराज यांच्या प्रतिमेला सिद्धार्थ पैठणे (जिल्हा सचिव-वंचित बहुजन कामगार आघाडी औंरगाबाद )यांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमा प्रसंगी शाहीर प्रकाश जाधव यांनी शाहु महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे गीत गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमास विकास जाधव, भास्कर गायकवाड , रंजना नरवडे, अशोक खिल्लारे, आम्रपाली रणवीर, शिवाजी वाकळे,,निर्मलाबाई पतंगे,नंदाबाई नरवाडे, लताताई घोडके,वनिताताई जाधव,रुपाली इंगोले यांच्यासह परिसरातील जनसमुदायाची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद गायकवाड यांनी केले तर आभार सुरेश नहारे यांनी मानले.

Sharing

Visitor Counter