गेवराई शहराला बऱ्याच दिवसांचा विसर पडलेल्या चोरीच्या घटनेला पुन्हा सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे
Georai

गेवराई शहराला बऱ्याच दिवसांचा विसर पडलेल्या चोरीच्या घटनेला पुन्हा सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे
गेवराई/प्रतिनिधी
शहरातील खाटिक गल्लीत चोरट्यांनी हात साफ करत नगदी रक्कमेसह सोन्याचे दागिने लंपास केले आहे.खाटिक गल्लीतील युनुस कुरेशी यांच्या राहत्या घरी ही चोरी झालेली आहे.सदरील घरफोडी ही पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज असुन अंदाजे दिड लाख रुपये किंमतिचा ऐवज लंपास करत चोरट्यांनी पोबारा केला आहे.घटनास्थळी गेवराई पोलीसांनी धाव घेत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
