शिवाजी चौकात विनाकारण गाड्या घेऊन फिरणाऱ्यावर पोलिसांकडून कडक कारवाई
Beed

शिवाजी चौकात विनाकारण गाड्या घेऊन फिरणाऱ्यावर पोलिसांकडून कडक कारवाई
बीड/प्रतिनिधी
बीड शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे संचारबंदी दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरनार्यावर आज सोमवारी शिवाजी चौकात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस दक्ष झाला असुन रस्त्यावरून विनाकारण फिरणार्यांची संख्या व दुचाकीवरून जाणाऱ्यांची ज्यास्त होत होती म्हणून पोलीसांकडुन चौका-चौकात पोलीस चौकशी चालू आहे तसेच आज शिवाजी चौकात पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.
याप्रसंगी सांगण्यात येणार्या कारणांची कागदपत्रे देखील पाहिली जात होती तर काहींना दंड्याचा प्रसाद देखील देण्यात आला संचारबंदी दरम्यान नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला मात्र विनाकारण फिरणार्यावरही पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.