संविधानाला झुगारून शस्त्राच्या बळावर राज्य करणाऱ्या उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा-लोकसेना

संविधानाला झुगारून शस्त्राच्या बळावर राज्य करणाऱ्या उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा-लोकसेना
प्रतिनिधी/प्रतिनिधी
भारतातील उत्तर प्रदेशामधील कानपूर येथे आंतकवादी प्रवृत्ति असणा-या आरोपींनी दिवसाढवळ्या पोलिसांवर बेच्छुट गोलीबार करुन आठ पोलिसांची हत्या केली व अनेकांना जख्मी केले या घटनेचा लोकसेना संघटना जाहिर निषेध करत आहे.
कानपूर येथील कुख्यात गुंड विकास दुबेच्या माणसांनी उपपोलीस अधिक्षकासह आठ पोलीस कर्मचा-यांची गोळ्या घालून हत्या केली या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झालेत या हत्याकांडाने उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देश हादरलेला आहे या हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र हे साधे नव्हते आतंकवादयाकडे असणारे आधुनिक शस्त्र या हल्लेखोरांकडे सापडली हे शस्त्र त्यांच्याकडे आली कशी या प्रश्नाचे उत्तर योगी सरकारने जनतेला दयाला हवे. लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी सरकारला अशी मागणी केली आहे की शहीद झालेल्या पोलिसांना व जखमींना आर्थिक मदत दयावी व विकास दुबे व त्याच्या गँगचा खात्मा करावा व या घटनेची जबाबदारी घेवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा व अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये गुंडागर्दी, महिलांवर अत्याचार, बलात्कार, खंडणी, अपहरण नेत्यांकडून लहानमुलींचे लैंगिक शोषण, जातीयवाद व मागासवर्गीयांवर होणारे अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे संविधानाला झुगारून शस्त्राच्या बळावर राज्य हाकणा-या राज्यात केंद्र सरकारने मा. राष्ट्रपती यांना उत्तर प्रदेशचा अहवाल देवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी. अशी मागणी लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.