कापूस पडताळणी यादीतील शेतकऱ्यांनी १० जुलैपूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणण्याचे आवाहन

कापूस पडताळणी यादीतील शेतकऱ्यांनी १० जुलैपूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणण्याचे आवाहन
बीड/प्रतिनिधी
धारूर, माजलगाव, परळी वै., वडवणी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात नोंदणी केलेल्या व पडताळणी नुसार प्रत्यक्ष कापूस शिल्लक आढळून आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मेसेज देण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी दि.१० जुलै २०२० पर्यंत आपला कापूस संबंधित कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा.
काही कारणाने कापूस पडताळणी यादीतील शिल्लक कापूस आढळून आलेल्या शेतकऱ्यांचा कापूस विक्री कारवाईचा राहिला असल्यास पडताळणी यादीतील ज्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मेसेज देण्यात आलेले आहेत.अशा शेतकऱ्यांना १० जुलै २०२० पूर्वी संबंधित कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणणे बाबत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बोलवावे असे कॉटन फेडरेशन मार्फत कळविण्यात आले आहे. याबाबत असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मान्यतेने असे आवाहन शिवाजी बडे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ,बीड यांनी केले आहे
तसेच या अनुषंगाने संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी अशा शेतकऱ्यांना मेसेज देऊन किंवा फोन द्वारे दि.१० जुलै २०२० पूर्वीं बोलावून घ्यावे असे सूचित केले आहे
कॉटन फेडरेशन मार्फत धारूर, माजलगाव, परळी वै.,वडवणी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासकीय हमी भावाने कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कडे नोंदणी केलेल्या व जिल्हाधिकारी, बीड यांच्या दि.१९जून २०२० च्या आदेशान्वये तहसील कार्यालय मार्फत झालेल्या तपासणीत प्रत्यक्ष कापूस शिल्लक आढळून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत SMS'द्वारे कापूस विक्रीसाठी बोलविण्यात आले होते.
तपासणी यादीतील सर्व शेतकऱ्यांना जे कापूस विक्री करिता आले व ज्यांचा कापूसFAQ प्रतीचा होता. अशा सर्व शेतकऱ्यांचा कापूस कॉटन फेडरेशन मार्फत खरेदी करण्यात आलेला आहे.
यामुळे एकही शेतकरी कापूस मोजमाप आविना शिल्लक नाही असे गृहीत धरून जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी व्यवस्थापन यांनी पुढील हंगामाकरिता मशनरी दुरुस्तीसाठी कॉटन फेडरेशन कडे परवानगी मागितलेली असून फेडरेशनने त्यांना तशी परवानगी दिलेली आहे.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय, परळी वै, जि. बीड (कॉटन फेडरेशन) यांच्यातर्फे यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे