आ.बाळासाहेब आजबे आणि माजी आ.भीमराव धोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीमुळे आष्टी नगर पंचायतीचा सुधारित विकास आराखडा प्रकाशित

आ.बाळासाहेब आजबे आणि माजी आ.भीमराव धोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीमुळे आष्टी नगर पंचायतीचा सुधारित विकास आराखडा प्रकाशित
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी नगरपंचायतीने काही दिवसांपुर्वी नगरपंचायतचा विकास आराखडा (डी.पी.) प्लॕन प्रकाशित केला होता.या प्लॕनवर अनेकांनी आक्षेप घेतले होते.याबाबत राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब आजबे व भाजपचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी एकञीत बीडचे जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेऊन हा आराखडा चुकीचा आहे त्यात दुरुस्त्या सुचविल्या योग्य दुरुस्त्या केल्या जातील ,नगर रचनाकार व नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी नकाशातील चुकाही मान्य केल्या होत्या आठ दिवसात विकास आराखडा पुर्नप्रकाशित करु असेही आश्वासन दिले होते. त्यानंतर तब्बल १५ दिवसांनी आष्टी नगरपंचायतीनै सुधारित विकास आराखडा काल एका वर्तमानपञात प्रकाशित केला आहे. यावरुन आ.आजबेमाजी आ.धोंडे यांच्या मागणीला यश आले आहे हेच स्पष्ट झाले आहे. समाधानकारक डीपी प्लॕन न झाल्यास आपण विधान सभागृहात तारांकीत प्रश्न
उपस्थित करु असेसा ईशारा आ. बाळासाहेब आजबे यांनी जिल्हाधिकारी यांच्या भेटीत दिला होता.आष्टी नगर पंचायत विकास आराखड्याला आजी,माजी आमदारांनी आक्षेप
घेतल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी यांच्यासमोर नगर रचनाकार,नगरपंचायतच्या
मुख्याधिकारी यांची आ.आजबे ,माजी आ.धोंडे यांच्यासमोर बैठक झाली होती.आ.बाळासाहेब आजबे आणि माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी नगर पंचायत विकास आराखड्यातील तरतुदींना आक्षेप घेतला होता.नियोजित विकास आराखडा रद्द करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली होती.आष्टी नगरपंचायतमध्ये लोकांनी नगरसेवक निवडून दिले असले तरी तिथे मनमानीपणे काम सुरू आहे.याबद्दल नगरसेवकांमध्ये नाराजी असली तरी कोणी उघडपणे बोलत नाहीत. आ.बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी नगर पंचायत कामात लक्ष घातले.जिल्हाधिकारी बीड यांना याबाबत निवेदन दिले होते.आष्टी नगर पंचायतीने सादर केलेला विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली होती.या नगर पंचायतीच्या कारभारावर देखील त्यांनी आक्षेप घेतले आहेत.नगरसेवकांच्या किती बैठका झाल्या, त्याच्या इतिवृतांची आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगची मागणी केली होती.नियोजित विकास आराखड्यास नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपावर मुख्याधिकारी यांनी काही कार्यवाही केली नाही असा आरोपही केला होता.मंदिर,मशीद यासारखी ठिकाणे ,आठवडी बाजार आणि शासकीय जागा यावर मनमानीपणे बदल करू नये अशी मागणी करण्यात आली होती.आष्टी नगरपंचायतीला डीपी प्लॕनमधील चुका दुरुस्ती करुन डीपी प्लॕन व नकाशा पुर्नप्रकाशित करण्याचा जिल्हाधिकारी यांनी बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला होता.
आ,बाळासाहेब आजबे ,माजी आ.भीमराव धोंडे यांच्या दणक्याने आष्टी नगर पंचायतीचे घुमजाव आणि सुधारित विकास आराखडा सादर केला आहे.काल एका वर्तमानपञातुन याबाबत पुन्हा नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे.
