प्राजक्ता गोल्हार हिची भारतीय कपास निगममध्ये मार्केटिंग मॅनेजरपदी निवड

प्राजक्ता गोल्हार हिची भारतीय कपास निगममध्ये मार्केटिंग मॅनेजरपदी निवड
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले आष्टी तालुक्यातील बावीचे सुपुञ विश्वनाथ गोल्हार यांची कन्या प्राजक्ता गोल्हार हिची भारतीय कपास निगममध्ये मार्केटिंग मॅनेजरपदी निवड झाली आहे. ही परिक्षा मार्च २०२० मध्ये झाली होती.महाराष्ट्र राज्यातून दोनच विदयार्थी निवडले आहेत.मुलीमध्ये प्राजक्ता गोल्हार हीची निवड झाली तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून तिचे अभिनंदन होत आहे प्राजक्ता गोल्हारचे समाजसेवक विजय गोल्हार ,पत्रकार उत्तम बोडखे , संत वामनभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ गोल्हार ,उत्तम पवार सर ,सुर्यभान कावळे , बावीचे सरपंच एम.डी.लटपटे यांनी केले आहे.
