बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव सोबतच मृत्यु आकड्यांत वाढ

Beed

बीड/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून बीड मध्ये कोरोनाने चांगल्या प्रकारे शिरकाव केला असुन रोजच कोरोना चा कहर चालुच आहे परंतु कोरोना बाधित रूग्णा सोबतच आता मृत्यूचा आकडाही वाढताना दिसून येत आहे.

काल रात्री पॉझिटिव्ह आलेली बीड शहरातील ७५ वर्षीय महिला आज सकाळी उपचार घेत असताना मरण पावली. गेल्या ४८ तासात चार कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील दोघे जिल्हाबाहेर उपचार  घेत होते. 
 
बीड जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या २१९ वर जावून पोहचली असून आतापर्यंत १२९ बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढत असतानाच या आठवड्यात उपचार घेणार्‍या रुग्णांचा मृत्यूही तेवढ्याच प्रमाणावर झाला आहे.

Sharing

Visitor Counter