धारूर नगरपरिषदेने केले योग्य नियोजन #प्रत्येक दुकानासमोर उभे केले न प कर्मचारी

Dharur

धारूर नगरपरिषदेने केले योग्य नियोजन

प्रत्येक दुकानासमोर उभे केले न प कर्मचारी

धारूर/प्रतिनिधी धारूर नगरपरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी सुहास हजारे यांनी शहरातील नागरिकांना ११ ते ३ या वेळेत जीवन आवश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी होवू नये व नागरिकांना अडचण निर्माण होवू नये यासाठी पाच फूट अंतरावर प्रत्येक दुकानासमोर चौकट रकाने अखले आहेत.

नागरिकांमध्ये सुरक्षित आंतर राहावे व किराणा,मेडिकल फळभाजी, या सारख्या माणसाच्या मुलभुत गरजा पुर्ण हुवावेत या हेतुने प्रत्येक दुकानासमोर न.प चे कर्मचार्यांना उभारण्यात आले. न.प चे कर्मचारी सर्वांना ओळीने सोडून सुरक्षित आंतर ठेवून खरेदी करण्यास भाग पाडत आहेत

पोलीस प्रशासनाने खुप कडकडीत बंद ठेवला आहे नागरिकांना मात्र प्रशासननाने दिलेल्या सूचना योग्य रीतीने पळताना दिसत नाहीत.धारूर नगरपरिषद कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.

Sharing

Visitor Counter