राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शुध्द व फिल्टर्ड पाण्याची हात धुण्यासाठी सोय.

Beed

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शुध्द व फिल्टर्ड पाण्याची हात धुण्यासाठी सोय.

येथे हात धुवा, मगच पुढे जा!

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शुध्द व फिल्टर्ड पाण्याची हात धुण्यासाठी सोय परळी/प्रतिनिधी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने "येथे हात धुवा, मगच पुढे जा" हा उपक्रम सुरू केला आहे. स्वच्छ आणि फिल्टर्ड पाणी आणि साबण नागरिकांना हात धुण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मोंढा, पोलीस स्टेशन, शहरातील विविध चौकात हे टँकर उभे केले जात असून, नागरिक तेथे हात धुवत आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याचा मुख्य स्रोत हा हात असल्याने वेळोवेळी हात धुवा असे सांगण्यात येत आहे. विविध कामाच्या निमित्ताने बाहेर निघालेल्या नागरिकांना शक्यतो हात धुण्याची सोय उपलब्ध नसते, ही बाब लक्षात घेऊन गेल्या आठवडाभरापासून राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने हा उपक्रम चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात आणि राज्यभरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध काळजीचे उपाय सुचविले जात आहेत. ज्यामध्ये तोंडाला रूमाल किंवा मास्क लावणे, स्वच्छता राखणे वेळोवेळी हात धुणे असे उपाय सांगितले जात आहेत. परंतू कामानिमित्त बाहेर पडलेल्या व्यक्तींना सहसा बाहेर हात धुण्यासाठीची सोय उपलब्ध नसते. ती सोय परळीत उपलब्ध व्हावी यासाठी दै.मराठवाडा साथी आणि राधामोहन साथी प्रतिष्ठाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. शुध्द आणि फिल्टर्ड म्हणजेच निर्जंतुकीकरण केलेले पाणी नागरीकांना हाथ धुण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून शहराच्या विविध मुख्य ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने 5००० हजार लिटरचे शुध्द आणि निर्जंतुकीकरण केलेले फिल्टर्ड पाणी नागरीकांना हात धुण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरातील पोलिस स्टेशन, शिवाजी चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, बसस्टॅण्ड समोर, मोंढा अशा विविध गर्दीच्या ठिकाणी टँकर नेले जात असून, नागरीकांना केलेल्या आवाहनाप्रमाणे तेथे सर्वजण हात धुत आहेत. विद्यमान स्थितीत हा उपक्रम परळी शहर व संभाजीनगर पोलिस स्टेशनच्या समोर सुरू आहे. सर्व पोलिस कर्मचारी व याठिकाणून जात-येत असलेले नागरीक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

Sharing

Visitor Counter