बीड, अंबाजोगाई शहरातील काही ठिकाणी आणि पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये कंटेनमेंट झोन घोषित, अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू

बीड, अंबाजोगाई शहरातील काही ठिकाणी आणि पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये कंटेनमेंट झोन घोषित, अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील पोलिस कॉलनी,बशीरगंज , अंबाजोगाई शहरातील बागवान गल्ली , कैकाड गल्ली (सदर बाजार) या ठिकाणी आणि पाटोदा तालुक्यातील करजंवन , काकडहिरा या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
बीड शहरातील पोलिस कॉलनी,बशीरगंज, बीड शहर येथील बिल्डिंग क्र.E-08 1 या ठिकाणी कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे
अंबाजोगाई शहरातील बागवान गल्ली येथील विनायक गणपतराव वाघोळकर यांच्या घरापासून ते प्रशांत दशरथ खैरमोडे यांच्या घरा पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे
अंबाजोगाई शहरातील कैकाड गल्ली (सदर बाजार) येथील संजय शिवाजी हिरवे यांच्या घरापासून ते सिताराम तात्याराम माने यांच्या घरा पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे
पाटोदा तालुक्यातील करंजवन येथे करंजवन गावात जाणारा डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूने कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे
पाटोदा तालुक्यातील मौजे काकडहिरा येथे निरगुडी - काकडहिरा रस्ता तुळजाभवानी मंदिराजवळ ते आडोळा वस्ती रस्ता या ठिकाणी कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे
प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून वरील या सर्व ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला असून वरील तीनही ठिकाणच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड सहिताचे कलम 144 लागू करण्यात आले आहेत.
