मार्च ते लॉकडाऊन अखेर काळातील वीज बिल माफ करावे - नगरसेवक अमर शेख

Beed

मार्च ते लॉकडाऊन  अखेर काळातील वीज बिल माफ करावे - नगरसेवक अमर शेख 

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री यांना निवेदन 

बीड/प्रतिनिधी 

माहे मार्च 2020 ते लॉकडाऊन अखेर पर्यंतचे लाईट बिले माफ करण्यात यावे अशी मागणी बीड ज़िल्हा एमआयएम च्यां वतीने राज्याचे ऊर्जा मंत्री ना नितीनजी राऊत साहेब यांना निवेदना द्वारे बीड नगरपरिषद एमआयएम चे गटनेते अमर शेख यांनी केली 
पुढे बोलताना नगरसेवक अमर शेख यांनी निवेदनात म्हटले केंद्राच्या सुचणेनुसार राज्यात देखील दिनांक 24 मार्च 2020 पासून पहिला लॉकडाऊनलागू करण्यात आला राज्यातील बहुतांश ज़िल्हयात लॉकडाऊन चार टप्प्यात मे 2020 अखेर पर्यंत जून चा पंधरवाळा देखील कायम राहण्याची अवस्था आहे लॉकडाऊन च्यां काळात सर्व सामान्याची उत्पन्ने बंद असल्यामुळे तसेंच शासकीय निर्देशाप्रमाणे घरात राहण्याच्यां सूचना असल्यामुळे भर उन्हाळ्यात सर्व सामान्य नागरिक हा घरात बसून होते त्यामुळे सहजीकच आहे विजेचा वापर सुद्धा बहुतांशी घरा मध्ये सरासरी पेक्षा जास्तच वापर झाल्याचा नाकारता येणार नाही अगदी हातावर पोट असणाऱ्यांचे उत्पन्न पूर्ण पणे बंद असल्याने आज सर्व सामान्य माणूस कोरोना सारख्या महामारीत खचून गेलेला असल्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा देण्यासाठी लाईट बिले माफ करण्यात यावी अशी मागणी बीड ज़िल्हा एमआयएम च्यां वतीने बीड नगरपरिषद चे गटनेते अमर शेख अमर एमआयएम बीड शहर अध्यक्ष मोमीन जुबेर एमआयएम युवा आघाडी चे  खय्यूम इनामदार यांनी केली

Sharing

Visitor Counter