राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या उपस्थितीत बीडमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या उपस्थितीत बीडमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा
उद्याच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - मोईन मास्टर,फारुख पटेल,अमर नाईकवाडे
बीड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दरम्यान बीड शहरात यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक ९-९-२४ रोजी सकाळी ११ वाजता शहरातील आशीर्वाद लॉन्स बार्शी रोड या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पक्षाच्या आगामी कार्ययोजनांवर चर्चा करण्यासाठी आणि बीड विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांचा दौरा जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबर ते आगामी निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांवर सखोल चर्चा करतील.
व मेळाव्यास बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब , मा.अमरसिंह पंडित साहेब ,जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण ,यांच्यासह प्रमुख नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी सर्व मान्यवर संवाद साधनार आहेत म्हणून
या मेळाव्यास हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. तसेच, कार्यकर्त्यांना पक्षाचे भविष्य, विकासाच्या योजना, आणि सामाजिक समस्यांवर तोडगे यासंदर्भात भरीव असे मार्गदर्शन यावेळी केले जाईल.आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष बळकटीकरण साठी हा मेळावा अतिशय महत्त्वाचा मानला जात असून या कार्यकर्ता मेळाव्यास शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी सर्वच सेल चे प्रमुख यांच्यासह नागरिकांनी बीड विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नेते मोईन मास्टर,फारुख पटेल, अमर नाईकवाडे यांनी केले आहे








