सोनीमोहा येथील डाॅ विजयश्री तोंडे यांची नेत्ररोगतज्ञसाठी निवड

Beed

सोनीमोहा येथील डाॅ विजयश्री तोंडे यांची  नेत्ररोगतज्ञसाठी निवड

किल्ले धारूर/प्रतिनिधी 

धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील केंद्रप्रमुख सुखदेव तुकाराम तोंडे यांची कन्या तर धारूर येथील दंतरोग तज्ञ डाॅ भगवान तोंडे यांच्या भगिनी  डाॅ  विजयश्री तोंडे यांची एम एस  नेत्ररोगतज्ञ या वैद्यकीय पदवीसाठी श्री . भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय धुळे येथे निवड झाली आहे . त्यांच्या या  यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे . सोनिमोहा येथे प्राथमिक शिक्षण झालेल्या डाॅ  विजयश्री तोंडे यांचे माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय गढी येथे झाले . तर अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे एम बी बी एस चे शिक्षण झाले . यावर्षी झालेल्या पीसी नेट परीक्षेमध्ये तिला घवघवीत यश मिळाल्यामुळे त्यांची नेत्ररोगतज्ञ वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे . तिच्या यशाबदद्ल धारूरचे नगराध्यक्ष डॉ . स्वरूपसिंह हजारी, डॉ . नवनाथ घुगे , डॉ . ज्ञानोबा मुंडे, डॉ . तुकाराम मुंडे ,डॉ . शिवदास तिडके, जिल्हा बँक संचालक  महादेव तोंडे , सरपंच विष्णू आडागळे, आदींनी अभिनंदन केले .

Sharing

Visitor Counter