जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली नागरिकांची तोबा गर्दी

Beed

जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली नागरिकांची तोबा गर्दी

बीड/प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी शहरात काही दिवसासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे यामुळे आज सकाळी  जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरीकांनी शिवाजी चौकात तोबा गर्दी केली होती.

प्रशासन सांगुन-सांगुन दमली आहे की गर्दी करणे टाळा परंतु नागरिकांच्या मनात कोरोना संदर्भात कसलीही भीती न राहता हे लोक जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली  गर्दी करताना दिसत आहे.कोरोनाची भीती नाही म्हणूनच बीड जिल्ह्यातील कोरोना चा आकडा दिवसेंदिवस  शतक करत आहे नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे विनाकारण घराबाहेर पडू नका,गर्दी करणे टाळा,मास्क  वापरा  व प्रशासनाला सहकार्य करा ,आपल्या कुठुंबाची काळजी घ्या.

Sharing

Visitor Counter