बीड ड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार चा 20 लाख कोटींचा पर्दाफाश

बीड ड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार चा 20 लाख कोटींचा पर्दाफाश
गेवराई/प्रतिनिधी
बीड जिल्हा युवक काँग्रेस तर्फे "कहा गये वो 20 लाख करोड"
हे आंदोलन करण्यात आले व छोटे व्यावसायिक,व्यापारी, शेतकरी व बेरोजगारांसोबत संवाद साधुन त्यांच्याकडून केंद्र सरकारने घोषित केलेल्या पॅकेजच्या लाभा संदर्भातील वस्तूस्थिती जाणून घेण्यात आली.
गेल्या ६ वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असून या सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या देशातील जनतेला भोगावे लागत आहेत.आज आपल्या देशाने बेरोजगारीचा उच्चांक गाठला आहे.
कोरोनाच्या संकटकाळातील अनियंत्रित व ढिसाळ कारभारामुळे युवकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची तर अनेकांवर आत्महत्येची वेळ आली आहे.
तर काही व्यसनाच्या व गुन्हेगारीच्या मार्गावर आहेत.
लघु व मध्यम उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत.केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेज पैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगांसाठी जाहीर केले होते.व केंद्रीय अर्थमंत्री मा.सीतारमण यांनी मीडियामध्ये मोठा गाजावाजा करून ते जाहीर देखील केले होते.परंतु यातील कुणालाच काहीच मिळालेले नाहीत. केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे त्या प्रमाणे शेतकऱ्यांना देखील काहीच मदत मिळाली नाही .म्हणून बीड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे,गेवराई विधानसभा अध्यक्ष किरण अजबकर,विशाल जंगले,महेश जाधव,अल्ताफ शेख,सचिन चव्हाण यांनी केंद्र सरकारचा 20 लाख कोटीचा पर्दाफाश करण्यासाठी गेवराई भाजप आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या मुख्य कार्यालय समोर शांततापूर्ण आंदोलन केले
