बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध व शहीदांना श्रद्धांजली

Beed

बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध व शहीदांना श्रद्धांजली

बीड प्रतिनिधी 

काश्मीर येथे पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला असून, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हा कार्यक्रम पार पडला. महिलांनी मेणबत्त्या पेटवत आणि पुष्पांजली अर्पण करत देशासाठी प्राणार्पण केलेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.या वेळी बोलताना महिला पदाधिकारी ॲड. हेमा पिंपळे यांनी केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली. पहलगामसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दहशतवादाला कडवे उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमात अनिताताई वाघमारे, राणीताई शेख,सुवर्णाताई चव्हाण, हिनाताई शेख, गणेश खोपे सर,भाऊसाहेब नांदे सर,नेहाताई खंडागळे,अशोक मसलेकर सर, यासह अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि नागरिकांची उपस्थिती होती. सर्वांनी ‘शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे आयोजकांनी सांगितले.

Sharing

Visitor Counter