स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Beed

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न 

बीड/प्रतिनिधी 

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे संपन्न झाला.

याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. 
समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे,  जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी  निमंत्रित उपस्थित होते.

यावेळी आणि उपस्थित मान्यवर शहीद कुटुंबीय यांची भेट घेऊन पालकमंत्री श्री मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
 त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत नाळवंडी आणि आणि ग्रामपंचायत  सांडरवनचे  सरपंच व ग्रामसेवक यांचा प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Sharing

Visitor Counter