आष्टीमध्ये पहिल्याच दिवशी ६१९ चाचण्या १७ जण कोरोना बाधित

आष्टीमध्ये पहिल्याच दिवशी ६१९ चाचण्या १७ जण कोरोना बाधित
आष्टी/प्रतिनिधी
दि. १८. शहरात आजपासून रॅपीड अॅटीजन चाचण्यांना सुरूवात झाली आहे.आज दिवसभरात शहरातील तिन केंद्रांवर ६१९ चाचण्या झाल्या असून १७जण पाॅझिटिव्ह आढळले असल्याची माहिती नायब तहसिलदार तथा मुख्याधिकारी प्रदिप पांडूळे यांनी दिली आहे.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या पादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रोगाचा प्रसार थांबावा या उद्देशाने व्यापारी,कामगार,दुधवाले,पाणि वाटप,भाजी विक्रेते यासह आदिंची रॅपीड अॅटीजन तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी प्रादुर्भाव वाढत चाललेल्या जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये ही मोहिम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यानुुसार शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा,जिल्हा परिषद माध्यमिक शाळा(मुलांची) व महात्मा गांधी विद्यालय या तीन केंद्रांमध्ये आज दि.१८ सकाळी ८ वाजल्यापासून या चाचण्यांना सुरूवात झाली आहे.दि.१८,१९,व २० या तीन दिवस घेण्यात येणार आहेत.पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या ६१९ नमुन्यापैकी १७ नमुने कोरोना बाधित आढळून आले असल्याची माहिती श्री.प्रदिप पांडूळे यांनी दिली.प्रशासनाच्या वतीने क्रमवार करण्यात आलेल्या यादीत अनावधननाने यादीत नाव घ्यायचे राहिले असल्यास आशा व्यक्तींनीही आपली चाचणी करून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे अहवान तहसिलदार वैभव महिंद्रकर यांनी केले आहे.तर
शहरातील राम मंदिर गल्ली (३८)पुरूष,
शनिचौक(२६) पुरूष,पेठगल्ली (६५)पुरूष,(५८) महिला मारवड गल्ली (४०),सायकड गल्ली (३४)पुरूष,सोलेवाडी (४०)पुरूष,वाळूंज (२७)पुरूष,सागर हाॅटेल पाठीमागे (४८) महिला,(५०)पुरूष,चिखली (६५)महिला,तर हनुमंतगाव (१६)महिला,(५८)महिला,(१०)पुरूष,(६५)पुरूष, भाजी मंडई १ व भाजी विक्रेते महिला १ असे एकूण या भागातील १७ जण पाॅझिटिव्ह आले असुन यामध्ये १० पुरूष तर ७ महिलांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी संतोष कोठूळे यांनी सांगितले.
