जय किसान गणेश मंडळाच्या वतीने पशुधन आरोग्य शिबीर सम्पन्न1018 पशु वरती उपचार

जय किसान गणेश मंडळाच्या वतीने पशुधन आरोग्य शिबीर सम्पन्न1018 पशु वरती उपचार
किल्ले धारूर/प्रतिनिधी
जय किसान गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी शेतकऱ्याच्या पशुधन हितासाठी पशुधन आरोग्य शिबीर घेण्यात आले.
जय किसान गणेश मंडळाच्या वतीने दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले शेतकऱ्याच्या हितासाठी पशुधन आरोग्य शिबिराचे आयोजन केले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो त्याला शेतात सहकार्य करणारे पशुधन हा त्याचा खरा मित्र मानला जातो मंडळाच्या वतीने दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी सात ते बारा या वेळेत आरोग्य शिबीर आयोजन केले त्यामध्ये आजारी पशुधनावर उपाय करण्यात आले या मध्ये प्रामुख्याने जंतूनाशक लस, गोमाशा निर्मूलन लसीकरण घटसर्प शेळ्यांसाठी पीपीआर खच्चीकरण वंधत्व तपासणी गर्भ तपासणी शस्त्रक्रिया इत्यादी तपासण्या केल्या मंडळाच्यावतीने आयोजित पशुधन शिबिरात करण्यात आल्या दसरा मैदान येथे पशुचिकित्सा करण्यात आली यावेळी उपस्थित तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोळी सर यांचे सहकार्य डॉ राधे जगताप, नकाते,लगस्कर, वायकर,या वेळी उपस्थित होते यावेळी मंडळाचे सदस्यांनी कर्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली
