वडवणी पोलिसांना फुल देऊन प्रोत्साहन दिले-प्रमिला माळी

वडवणी/प्रतिनिधी
कोरोना सारख्या आपत्ती ला लढण्यासाठी पोलिस कर्मचारी रस्त्यावर दररोज सज्ज उभी आहे.वडवणीत शिवाजी चौकात पोलिस प्रशासन दिवस रात्र सेवा करताना दिसत आहे.याचाच आढावा घेत त्याठिकाणी प्रमिला ताई यांनी पोलिस कर्मचार्याना अजुन प्रोत्साहन देण्यासाठी फुल देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
आज लॉकडाऊनचा आठरा दिवस पुर्ण झाले,पोलिस प्रशासन व डॉक्टर हे आपल्या जिवाची पर्वा न करता स्वताचा जिव धोक्यात ठेवून आपली सेवा करत आहे, जनतेसाठी दिवस रात्र सेवा करत असलेल्या कर्मचार्यंना आज प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
देशांवर खुप मोठे संकट उभे राहिलेले आहे सर्व जनतेने पोलिस प्रशासनाला सहकार्य करून आपला कर्तव्य पार पाडला पाहिजे
म्हणुनच आज पोलिस कर्मचार्यांना शिवाजी चौकात उभे असलेले पोलिसकर्मचार्यांना प्रमिला ताई माळी ओतारी यांनी त्यांचे आभार मानले व त्यांना गुलाबाचे फुल देऊन सुभेच्छा दिल्या.








