संचार बंदी शितील होताच वडवणीत नागरिकांची गर्दी

Wadwani

वडवणी/प्रमिला माळी 
 कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज उभी असून आपल्यासाठी कठोर निर्णय घेत आहे व आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी जनतेला बार-बार आव्हान केले आहे गर्दी करणे टाळा योग्य ते अंतर आपल्या मध्ये ठेवा पण लोक याचा उल्लंघन करताना वडवणी मध्ये दिसत आहे.

शितीलतेच्या वेळेस बाहेर पडलेले लोक अशी गर्दी करू राहिले जसे त्यांना भाजीपालाभेटणार नाही.लोकांना सारखे-सारखे आव्हान करून देखील लोक कोरोना सारख्या आपत्ती ला  बळी पडण्यासाठी आमंत्रण देताना दिसत आहे.

लोक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाही परंतु  आज बीड जिल्ह्यामध्ये एक कोरोना पाॅजीटीव आष्टी तालुक्यात त्यामुळे बीड जिल्ह्यात आता वाईट परिस्थिती होण्यासाठी वेळ लागणार नाही. 

कोरोना सारख्या माहामारीला गांभीर्याने घेण्याची गरज त्यला बळी न पडता  प्रशासनाला सहकार्य करा घरीच राहा  कारण असेल तरच बाहेर पडा व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

Sharing

Visitor Counter