शिवसेनेच्यावतीने जिव्हाळा केंद्रावरती अन्नधान्य, वृक्षारोपण क्रीडा साहित्याचे वाटप

Beed

शिवसेनेच्यावतीने जिव्हाळा केंद्रावरती अन्नधान्य, वृक्षारोपण क्रीडा साहित्याचे वाटप

संपर्कप्रमुख आनंदजी जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

बीड/प्रतिनिधी 

सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शिवसेनेने लॉकडाऊनमध्ये अनेक गरजवंतांना मदतीचा हात दिला. शेतकऱ्यांनाही बियाण्यांचं वाटप करून धीर देण्याचं काम जिल्हा संघटक नितीन धांडे यांनी केलं आहे. आता शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने गरजूंना किराणा किटचे वाटप आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी जीवाला केंद्र येथे अन्नधान्य वाटप तसेच वृक्ष लागवड व क्रीडा साहित्याचे वाटप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे सचिन मुळूक सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबोरे युवा नेते योगेश भैय्या शिरसागर यांच्या हस्ते शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन भैय्या धांडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

संकट कुठलंही असो. मग तो दुष्काळ असो, अतिवृष्टी असो वा गारपीट. शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगारांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. 2015च्या दुष्काळामध्ये तर शिवसेनेने किरणापासून ते लग्न लावून देण्यापर्यंत मदतीचा महायज्ञ केला होता. गेल्या 5 महिन्यांपासून तर राज्यात, देशात आणि जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना मागे कशी राहील. आता तर सुदैवाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आदेशानुसार शिवसेनेने लॉकडाऊनमध्ये मोठे सामाजिक काम उभे केले आहे.
बीडमध्ये शिवसेनेने गरजूंच्या भोजनाची, धान्याची किराणाची सोय शिवसेनेने केली. शिवाय अडचणीत सापडलेल्या शेकडो शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किट वाटपाचं काम शिवसेनेनं हाती घेतलं आणि पूर्णत्वास नेलं देखील. शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे यांच्या माध्यमातून गरजूंना बुधवार, दि. 3 सप्टेंबर रोजी बीड शहरातील जिव्हाळा केंद्र येथे किराणा धान्य, वृक्षारोपण, क्रीडा साहित्य वाटप करण्यात आहे. 
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या विचारांना अनुसरून युवासेनाप्रमुख नामदार आदित्यजी ठाकरे साहेब,शिवसेना संपर्क नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब, माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्कप्रमुख माननीय आनंदजीं जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा संघटक नितीन धांडे यांच्या माध्यमातून जिव्हाळा केंद्र येथे किराणा धान्य वृक्षारोपण व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले आहे. 
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुशील पिंगळे शहर प्रमुख सुनील सुरवसे जिल्हा समन्वयक योगेश नवले सुधाकर बावणे दिलीप भोसले एकनाथ खांडे जिव्हाळा केंद्राचे प्रमुख राजू वंजारे शितल ताई परदेशी वैद्य साहेब यश वंजारे यांच्या चहा इतर मान्यवर उपस्थित होते. इथून पुढेही शिवसेनेच्या माध्यमा

Sharing

Visitor Counter