गाव समृध्द करण्यासाठी नरेगा योजनेचा उपयोग करा - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Beed

गाव समृध्द करण्यासाठी नरेगा योजनेचा उपयोग करा - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

समृध्द गाव स्पर्धेत धारूर तालुक्यातील 23 गावे सहभागी

किल्ले धारूर/इरफान शेख 

धारुर येथील तहसील कार्यालयात आज पाणी फाऊंडेशन आयोजित समृध्द गाव स्पर्धा 2020-2021 प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावर उपस्थित होते गाव समृध्द करण्यासाठी नरेगा योजनेचा उपयोग करावा असे प्रतिपादन त्यांनी मार्गदर्शन पर केले

यावेळी व्यासपीठावर तहसिलदार वंदना शिडोळकर , गटविकास अधिकारी सोपान अकेले, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, कृषी अधिकारी शरद शिनगारे ,दादा घोडके इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शिनगारे यांनी केले धारूर तालुक्यातील 23 गावे समृध्द गाव स्पर्धेत सहभागी झाले आहेत या स्पर्धेचा कालावधी दीड वर्ष असणार आहे समृध्द गाव स्पर्धेत करावयाची विविध कामे , माती बांध, वनीकरण विभागाचे सहकार्य या विषयी त्यांनी माहिती दिली 

पुढे मार्गदर्शन पर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले गावाचा विकास करावयाचा असेल तर सर्व गावकऱ्यांनी मिळवून करावा लागेल गाव कायम स्वरुपी समृध्द होण्याचे स्वप्न सर्वांनी पहावे लागेल सर्व गावकऱ्यांनी कामाची यादी करून सर्व कामे करून घ्यावीत या कामी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य मिळेल  गावाचा नरेगाचा रेशो 60:40 असला पाहिजे           यात 60% निधी मजुरीवर खर्च झाला पाहिजे 40 टक्के इतर साहित्यावर नारेगा योजनेतून गावास १ कोटी रुपयांपर्यंत देखील कामे करता येतात असेही ते म्हणाले   कार्यक्रमास २३ गावातील गावकरी , ग्रामसेवक, तलाठी , पत्रकार, जलदुत इत्यादी उपस्थित होते.

आळशी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही केली जाईल**  जे कर्मचारी समृध्द गाव स्पर्धेत काम करण्यास दिरंगाई करतील  आळशी पणा ठेवतील अश्या कर्मचारी यांची गई केली जाणार नाही ते मी सहन करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल बी डी ओ व तहसिलदार यांनी दक्ष राहून कामे करून घ्यावीत असा  सजड इशारा जिल्हाधिकारी यानी सर्व कर्मचारी यांना दिला

Sharing

Visitor Counter