काकू नाना भाजीपाला आडत मार्केटमध्ये नवीन शौचालय फक्त नावापुरतेच का?महिलांनी शौचास उघड्यावरच बसायचं का?

काकू नाना भाजीपाला आडत मार्केटमध्ये नवीन शौचालय फक्त नावापुरतेच का? महिलांनी शौचास उघड्यावरच बसायचं का?
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील काकू नाना भाजीपाला आडत मार्केटमध्ये शौचालय असून नसल्यासारखे झालेला आहे या ठिकाणी बीड शहरातील सर्व गावांमधून शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी येतात त्यात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग देखील असतो बाहेरगावावरून भाजीपाला विकणाऱ्या महिलांना शौचालय नव्हता म्हणून तात्काळ शौचालय बनवण्यात आला मात्र हे नाव पुरतेच का? कारण शौचालय तर बांधलं पण पाणी ची व्यवस्था काहीच नाही व त्या ठिकाणी स्वच्छता देखील नाही मग महिलांनी अजून ही शौचास उघड्यावरच बसायचं का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
दलाल संघटना अध्यक्षांच्या निदर्शनात का येत नाही?
बीड शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये शौचालय असणं गरजेचे आहे परंतु आतापर्यंत काकु नाना भाजीपाला आडत मार्केटमध्ये शौचालय नव्हतं कसं तसं शौचालय तयार करण्यात आले तर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही अजून ही महिला उघड्यावर शौचास बसतात मग याकडे दलाल संघटना अध्यक्ष दुर्लक्ष का करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे भारत सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत आहे उघड्यावर शौचास बसल्यास पॅनल्टी घेत आहे तर या ठिकाणी लोक उघड्यावरच बसतात तर याची पॅनल्टी कोणाकडून घ्यायची? कुणावर कारवाई होणार? असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
व्यापाऱ्यांना अशा अवस्थेत पडलेला शौचालय दिसत नाही का?
अशा अवस्थेत शौचालय पडलेला आहे ठोक व्यापाऱ्याकडे येणाऱ्या शेतकरी व किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना शौचालयाची व्यवस्था नाही म्हणून उघड्यावर महिला व पुरुष शौचालयाला बसतात मग व्यापाऱ्यांना हे दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.
