काकू नाना भाजीपाला आडत मार्केटमध्ये पिण्याच्या पाण्याची काय सुविधा?

काकू नाना भाजीपाला आडत मार्केटमध्ये पिण्याच्या पाण्याची काय सुविधा?
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील काकू नाना भाजीपाला आडत मार्केट मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने शेतकरी व किरकोळ व्यापार्यांची अडचन होताना दिसतआहे.
या ठीकाणी बाहेर गावारून शेतकरी येत असतात व मालवा विकुसतर आडत मार्केट मध्येच बसुन असतात पुरूषांबरोबरच
महिलांचा देखील समावेश असतो परंतु त्यांच्या सोय साठी याठिकाणी कसलीच सुविधा उपलब्ध तर नाहीच? ना पिण्याच्या पाण्याची सोय याठिकाणी दिसत आहे.
बाहेरगावावरून शेतकरी व किरकोळ व्यापाऱ्या सोबतच ठोक विक्रेते यांना देखील याची परेशानी उचलावी लागत आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही बीड शहरातील मार्केटच्या विविध समस्या असून याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.
दलाल संघटना अध्यक्ष काय करता?
काकु नाना भाजीपाला आडतमार्केट मध्ये किती तरी वेगवेगळ्या समस्या आहेत परंतु दलाल संघटना अध्यक्षांना हे समस्या दिसत नाही का? असा प्रश्न नागरीकात उपस्थित होत आहे.
