अंबाजोगाई येथे मौतीसाठी जाणाऱ्या चौघांवर होळ ता,केज येथे प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

अंबाजोगाई येथे मौतीसाठी जाणाऱ्या चौघांवर होळ ता,केज येथे प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
किल्लेधारूर/वार्ताहर
धारुर येथील मुस्लिम धार्मिक कार्य करणाऱ्या व अंबाजोगाई येथे मौतीसाठी जाणाऱ्या चौघांवर होळ ता.केज येथे रात्री अज्ञात लोकांनी प्राणघातक हल्ला केला असुन या समाजकंटकांना तात्काळ अटक करुन कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलिस निरिक्षक धारुर यांचेकडे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.१६ बुधवार रोजी रात्री दहाच्या सुमारास धारुर येथील मुस्लिम धार्मिक कार्य करणाऱ्या व अंबाजोगाई येथे मौतीसाठी जाणाऱ्या चौघांवर होळ ता.केज येथे सात ते आठ जनांनी प्राणघातक हल्ला केला. यात दोघांची प्रकृती गंभीर असुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. यावेळी संबंधित लोकांनी जातीवाचक शिविगाळ करत जखमीं जवळची रोख रक्कम पळवली. या हल्ल्यात धारुर येथील तबलिग जमातचे प्रमुख निजामभाई काजी, सोहेल तांबोळी गंभीर जखमी झाले असुन त्यांच्या वर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशा या प्राणघातक हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करुन कारवाई करावी नसता मुस्लिम समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलिस निरिक्षक, पोलिस ठाणे, धारुर यांना देण्यात आला.
