ढालेगाव बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले,पाण्याची आवक वाढण्याची शक्यता

ढालेगाव बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडले,पाण्याची आवक वाढण्याची शक्यता
गंगामसला/शेख अबुजर
नाथ सागर धरण क्षेत्रात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक कायम असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे गोदावरीमध्ये पाणी सोडण्यात येत असल्याने माजलगाव येथील धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी सोडणे चालू असून त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे गोदावरी पात्रातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे.
माजलगाव येथील धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आला आहे .यामुळे गोदावरी गंगेला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र सध्या ढालेगाव येथील बंधाऱ्याच्या १६ पैकी १४ दरवाजे उघडण्यात आले असून स्थितीत गंगामसला येथील मोरेश्वर मंदिरांला पाण्याचा वेढा कायम आहे. तसेच जुना माजलगाव-पाथरी पूला जवळून पाणी वाहत असून पुढील काळात धरणक्षेत्रात पाण्याची आवक कायम राहिल्यास गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला असून पूरग्रस्त ग्रामस्था मध्ये भीती निर्माण झाली आहे.
