माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब 100 कुटुंबाना अन्न धान्य वाटप

Beed

*स्वाभिमानचे प्रा सचिन उबाळे यांचा उपक्रम*
 बीड/प्रतिनिधी 
माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा नारायनरावजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान संघटना बीड जिल्ह्याच्या वतीने बीड शहरातील गोरगरीब 100 कुटुंबाला अन्न धान्य वाटप करण्यात आले.

स्वाभिमान संघटना प्रत्येक सामाजिक प्रश्नात पुढे येऊन काम करते.सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासले असून जनतेमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले असून या मध्ये गोरगरीब जनते पुढे अनेक समस्या असल्याने, वाढदिवसाचा खर्च टाळून स्वाभिमान संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष तथा आमदार मा नितेशजी राणे साहेब,पंकजाताई मुंडे, खा,प्रीतमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमान संघटना जिल्हाध्यक्ष प्रा सचिन भैय्या उबाळे यांच्या पुढाकाराने

माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा नारायनरावजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या बीड शहरातील 100 कुटुंबाना जीवनावश्यक असणाऱ्या अन्न धान्य व भाजीपाला यांचे वाटप करण्यात आले या वेळी स्वाभिमान चे भोला जाधव, बाळासाहेब कदम, गणेश माने, नितीन डिसले, विकास वायभट, बाबू उबाळे, सागर टेकाडे,विशाल गायकवाड, मयुर त्रिभुन,रोहित गायकवाड, अजय त्रिभुन,सुहास विद्यागर, आदी स्वाभिमान च्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Sharing

Visitor Counter