स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ;दिंद्रुड परिसरात एक कोटींचा गुटखा पकडला

Beed

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ;दिंद्रुड परिसरात एक कोटींचा गुटखा पकडला

दिंद्रुड प्रतिनिधी 

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या संशयित कंटेनरला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान भोपा पाटी वर पकडले असता जवळपास एक कोटी रुपयांचा राज निवास पानमसाला गुटखा आढळून आला. दिंद्रुड पोलीस स्टेशनला कंटेनर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती. 

मिळालेली अधिक माहिती अशी की, गोपनीय माहितीच्या आधारे तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या एका कंटेनरला स्थानिक गुन्हे शाखेचा दोन पथकांनी पकडत दिंद्रुड पोलीस स्टेशनला आणले असता जवळपास 75 लाख रुपयांचा राजनिवास पानमसाला नावाचा गुटखा व 25 अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई चालू होती. 

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान चांद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे सुशांत सुतळे, पो.हे.कॉं. शेख नसीर अशोक दुबाले कैलास ठोंबरे राजू पठाण मारुती कांबळे अर्जुन यादव वाहन चालक गणेश मराडे, अतुल हराळे यांनी ही कारवाई केली.

कंटेनर चालक विद्या राम शामलाल रा.निनवाया अचनेर, आग्रा, उत्तर प्रदेश यास दिंद्रुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Sharing