कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट करण्याचा भाजप सरकारचा डाव : ॲड.श्रीनिवास बेदरे

कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट करण्याचा भाजप सरकारचा डाव : ॲड.श्रीनिवास बेदरे
गेवराई (वार्ताहर)
केंद्र सरकारच्या वतीने आणण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ बीड जिल्हा युवक कॉंग्रेस तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती, गेवराई येथे निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने मोजक्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी आपला "प्रोड्युस ट्रेड अँड कॉमर्स"आणि 'प्राईस अशोरंस अँड फार्म सर्विसेस' बिल कायदा आणला यामुळे बाजार प्रणाली नष्ट होऊन लाखो मजुर,कमीशन एजंट,मुनीम,लोडर,ट्रांसपोटर्स आणि विक्रेते यांना आपली रोजी रोटी गमवावी लागणार आहे.
शेतकऱ्यांनाही बाजारभावानुसार ना हमीभाव मिळणार ना त्यांच्या पिकाचे मूल्य,
शेतकरी (सशक्तिकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि शेतसेवा विधेयक देशातील शेतकर्याच्या विरोधात आणले आहे या विधेयकाविरोधात
हुकूमशाही आणि शेतकरी विरोधी मोदी सरकारच्या विरोधात आज कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई येथे आंदोलन करण्यात आले .
या वेळी बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.श्रीनिवास बेदरे, तालुका अध्यक्ष किरण अजबकर,बाळासाहेब आतकरे,निलेश तौर,रोहित गुणारे, बालाजी बांडे,जिजा जगताप, बलिराम गिराम,सोनू भारती,आलोक अंबिकार,कारण बोरडे, गोटू सावंत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
