बीड जिल्हा सार्वजनिक वितरण प्रणाली व मुफ्त धान्य वाटप खालील प्रमाणे राहील

Beed

बीड/प्रतिनिधी 
अंत्योदय अन्न योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही योजना दरमहा एप्रिल मे व जून २०२०  प्रती  महिन्यासाठी राहणार आहे. प्रति २० किलो गहू व तांदूळ १२ किलो असे एकूण ३५ किलो राहिल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तांदूळ  प्रति सदस्य ५  किलो मुफ्त  भेटणार भेटणार आहे. याचा भाव फलक  गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो व ५ किलो सदस्य तांदूळ मुफ्त असेल.

प्रधानमंत्री कुटुंब लाभारती योजना व दरमहा प्रधानमंत्री तसेच गरीब कल्याण योजना हि  एप्रिल मे व जून २०२० या कालावधीसाठी प्रति सदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ  व प्रति सदस्य ५ किलो मुफ्त भेटणार आहे. याचा भाव फलक  गहू २ रूपये  किलो व  तांदूळ ३ रूपये किलो असा राहील व  प्रति सदस्य ५ किलो तांदूळ मुफ्त असेल.

ए.पी.एल केशरी शेतकरी लाभार्थी योजना लोकांना दरमहासाठी आहे. या योजनेत  प्रति सदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असेल  त्याचा भाव यांप्रमाणे राहील  गहू ३ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो असेल.

केशरी शिधापत्रिका धारकांना मे व जून २०२० या कालावधीमध्ये भेटेल व प्रति सदस्य ३ किलो गहू व  २ किलो तांदूळ असा  असेल याचा भाव फलक  गहू ८ रुपये किलो व तांदूळ १२ रुपये किलो असा राहील. 

तसेच उज्वला गॅस धारकांना प्रतिमहा एप्रिल-मे व जून २०२० यादरम्यान दरमहा १ सिलेंडर प्रमाणे एकूण तीन सिलेंडर मुफ्त  मिळणार आहे.  सिलेंडरची किंमत दरमहा गॅस धारकांच्या खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यावी असे अशे आदेश जिल्हाधिकारी यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

Sharing

Visitor Counter