नाथ बायोजिन्स (इ)लि औरंगाबाद कंपनीच्यावतीने गुलाबी बोंड आळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन मोहीम

नाथ बायोजिन्स (इ)लि औरंगाबाद कंपनीच्यावतीने गुलाबी बोंड आळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन मोहीम
किल्ले धारूर/प्रतिनिधि
तालुक्यामध्ये बी टी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे सध्याच्या परिस्थितीत कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी नियंत्रणासाठी नाथ बायोजीन्स(इ) लिमिटेड औरंगाबाद कंपनीच्या वतीने किल्ले धारूर तालुक्यांमध्ये 30 गावांची निवड करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत दररोज सकाळी 3 गावे व संध्याकाळी 2 गावे याप्रमाणे गावात जाऊन उपस्थित शेतकऱ्यांना कपाशी बोंड आळी नियंत्रणा विषयी चे मार्गदर्शन करण्यात येत आहे ही मोहीम 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे कंपनीचे एरिया मॅनेजर के एफ शेख यांनी केले आहे या उपक्रमाला रवी कृषी सेवा केंद्र चे भारत शिनगारे कंपनी प्रतिनिधी अशोक तोडकर शेतकरी बांधव उपस्थित होते
तसेच या मोहिमेचा प्रारंभ तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे व मंडळ कृषी अधिकारी एस एल मुसळे यांनी केला
